breaking-newsपुणे

पुणे |चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी आई अटकेत

पुणे : चार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडून जाणाऱ्या पाषाणहृदयी आईला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील कोथरुड पोलिसांनी अवघ्या काही तासात महिलेला बेड्या ठोकल्या.

महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. चार महिन्यांच्या बाळाला रस्त्यात सोडल्याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल केला होता. या अंतर्गत तिला अटक करण्यात आली आहे.

चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झुडुपाखाली हे गोंडस बाळ काल रात्री सापडलं होतं. बाळाबद्दलची बातमी समजताच वाहतूक पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button