breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पार्थ पवार यांचे व्हीजन : ‘डेव्हलपमेंट कॅपिटल’ म्हणून पुण्याची पुन्हा ओळख निर्माण झाली पाहिजे!

पुणे । प्रतिनिधी  

शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर, आयटी हब…अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख पुन्हा एकदा ‘डेव्हलपमेंट कॅपिटल’ अशी झाली पाहिजे, असे ‘व्हीजन’ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी ठेवले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त विक्रम कुमार यांची युवा नेते पार्थ पवार यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी भारताची ‘डेव्हलपमेंट कॅपिटल’ अशी पुण्याची असलेली ओळख पुन्हा निर्माण करण्याबाबत काय-काय प्रकल्प, धोरण राबवली जात आहेत. याची सविस्तर माहिती घेण्यात आली.

पार्थ पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या व्हीजनप्रमाणे पुण्याची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ योग्य रितीने अंमलबजावणी करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button