breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पार्थ पवार भाजप मध्ये येत नाहीत आणि आम्ही घेतही नाही… : खासदार गिरीश बापट

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगलेली होती. पार्थ पवार भाजपमध्ये जाणार का, असा सवाल विचारला जात असताना पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत.

“पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाहीत. त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे हा घरातला आहे. अन आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांचा त्यांनी कुटुंबात सोडवावा” असे गिरीश बापट म्हणाले. पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा लगावल्याबद्दल प्रश्न विचारलेला असता, ‘जय श्रीराम’ एकटा पार्थ थोडी म्हणतो, सर्व जग म्हणतं, असंही बापट म्हणालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button