breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पार्थ पवारचा बाप सांगतोय… तो सिंगापूरला गेलाच नाहीय

पुणे- सगळी माहिती खोटी आहे. पार्थ पवारचा बाप सांगतोय की तो सिंगापूरला चार महिने झाले गेलाच नाहीय. पाहिजे तर त्याचा पासपोर्ट दाखवतो असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून WhatsAppवर फिरणाऱ्या पार्थ पवारांविषयीच्या माहितीवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

पार्थ हा सिंगापूरमध्ये अडकून पडला आहे आणि त्याच्या सुटकेसाठी विशेष विमान पाठविण्यात आलं होतं असा मेसेज WhatsAppवर व्हायरल झाला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोनावर पत्रकार परिषद घेतली. पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त तातडीच्या सेवा पुरवणाऱ्यांसाठी सुरू ठेवलं असून आता जर कुणी ऐकणार नसतील तर फक्त कर्मचाऱ्यांसाठीच त्यांना मर्यादीत ठेवून बाकी सगळं बंद कराव लागेल असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हा, मुंबई पुण्यात आणि पिंपरीत हाच निर्णय घेतला जाऊ शकतो. कामगारांचा पगार कापू नका, तातडीच्या गरजेच्या वस्तू विकणारे, भाजीवाले यांना सूट देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button