breaking-newsताज्या घडामोडीपुणे
धक्कादायक! पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/dr-ashton-what-to-do-sexual-assault-rape.jpg)
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकिकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्ग झालेल्या रुग्णांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे काही अपप्रवृत्तीही समोर येत आहेत. हडपसरमधील खासगी रुग्णालयात असाच एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील वॉर्डबॉयने विनयभंग केलेला आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. या प्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर हडपसर पोलिसांनी या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच विनयभंगप्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला अटक केली. आरोपीचं नाव अशोक नामदेव गवळी (वय 40, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) असं आहे.