breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दारु पिऊन पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा गाेंधळ

पुणे | महाईन्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक 9 मध्ये रविवारी रात्री काही विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातल्याची घटना समाेर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाला ही बाब समजताच विद्यार्थ्यांना पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न समारे आलेला आहे.

रविवारी रात्री उशीरा विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक 9 मध्ये विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातला. ही बाब काही विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना तसेच विद्यापीठ प्रशासनाला सांगितली. सुरक्षारक्षकांनी दारु पिणाऱ्या विद्यार्थ्यांना खाेलीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी दरवाजा न उघडल्याने त्यांनी खाेलीच्या काचा फाेडून विद्यार्थ्यांची अवस्था पाहिली. त्यानंतर दरवाजा ताेडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आतील विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडला. सुरक्षारक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची मेडीकल चाचणी केली आहे. त्यानंतर त्यांना पाेलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button