breaking-newsताज्या घडामोडीपुणे

तानाजी चित्रपटातील दृश्यावरुन वाद उफाळला, संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित “तानाजी : द अनसंग वॉरीयर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही वादग्रस्त चित्रण केले आहे. ते चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी केली संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे.

आज (दि.20) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांच्यावर काही तरी फेकल्याचे दाखविण्यात आले आहे. यातून चुकीचा संदेश जात असल्याने वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा प्रसंग चित्रपटातून वगळावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधील याच सीनवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे…


Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button