तरुणाची पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/crime-4.jpg)
पुणे- वस्तीत धिंगाणा घालून नागरिकांना मारहाण करणाऱ्या तरुणास ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांस शिवीगाळ व धक्कबुक्की करण्यात आली. याप्रकरणी संबंधीत तरुणास खडक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली आहे. अनिकेत संजय अडागळे (21, रा. कासेवाडी, भवानी पेठ), असे अटक आरोपीचे नाव आहे. अनिकेत अडागळे हा रात्री दोनच्या सुमारास लोहियानगर येथील बांबू मामडी चौकात रहिवाशांना शिवीगाळ करुन मारहाण करत होता. यावेळी फिर्यादी पोलीस शिपाई एस. डी. लामतुरे व पोलीस शिपाई खामकर हे त्याला लोहियानगर पोलीस चौकीत घेऊन जात होते.
तेव्हा त्यांने दोघांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यानंतर त्यांची दुचाकी खाली पाडून शासकीय कामात अडथळा आणला. त्याला लोहियानगर चौकीत आणले असता तेथील गस्तीवरील अधिकाऱ्यालाही त्याने शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. चौकीतील इतर कर्मचाऱ्यांनाही त्याने शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक टेमघिरे तपास करत आहेत.