breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन…

पुणे | महाईन्यूज |

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. विद्या बाळ या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात गुरूवारी म्हणजे 30जानेवारीला सकाळी अखेरचा श्वास घेतला. महिलांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या अशी विद्या बाळ यांची ओळख होती.



विद्या बाळ यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभात रोड येथील ‘नचिकेत’ या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये विद्या बाळ सक्रिय होत्या. लेखिका आणि संपादक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. विद्या बाळ यांच ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक अत्यंत गाजलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button