Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
‘चित्रा वाघ जरा हिशोबात’, रुपाली चाकणकरांचा इशारा
![मोठी बातमी! महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकरांचा राजीनामा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Rupalitai-Chakankar.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यातील तू-तू-मै-मै अजिबात थांबताना दिसत नाही. ‘तुमचे दात जास्तचे दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही.’ असे ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता.
मात्र, रुपाली चाकणकर या देखील मागे हटण्यास तयार नाहीत. कारण त्यांनी पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. ‘आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा, आजही पळता भुई कमी होईल…. हिशोबात. झाकली मूठ सव्वा लाखाची..’ असे ट्वीट त्यांनी दलबदलू या हॅश टॅगने चित्रा वाघ यांना टॅग केले आहे.