Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
घराबाहेर फलक लावून पुणेकरांनी मानले कोरोना योद्धांचे आभार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pune_people.png)
कोरोनाचा व्हायरसविरूद्ध लढ्यासाठी मैदानात उतरलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिसांचे पुणेकरांनी आभार मानले आहेत. कोरोनाचे संकट राज्यावर उभं ठाकलं असतांनाही आपल कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून पुणेकरांनी आपआपल्या घराबाहेर त्यांचे आभार मानणाऱ्या पाट्या, लावले आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एकीकडे टवाळखोर पोलिसांसोबत वाद घालत असतांना दुसरीकडे पुण्यातील नागरिकांनी कोरोना योद्धांचे आभार मानले आहेत. आपआपल्या घराबाहेर कोरोना पुणेकरांनी लावलेल्या ह्या पाट्या, बॅनर्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.