breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गोपीचंद पडळकरांचे भिडेंसोबत फोटो व्हायरल

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना सांगलीची उमेदवारी निश्चित झाली आहे. अशातच आता पडळकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असल्याची छायाचित्रे चव्हाट्यावर आली आहेत. एवढेच नव्हे तर, पडळकर यांनी भिडे यांना ११ लाख रुपयांची मदत केल्याचा संदेशही व्हायरल झाला आहे. यामुळे पडळकर अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रकाश आंबेडकर हे भिडे गुरूजींचे कट्टर विरोधक आहेत. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणात भिडे गुरूजी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर यांनी तीव्र आंदोलन केले होते. आंबेडकरी जनतेमध्येही भिडे यांच्याविषयी तीव्र संताप आहे. भिडे यांच्यासोबत पडळकर यांचे खाक्या रंगाच्या अर्ध्या विजारातील छायाचित्रे दिसत आहेत.

कट्टर संभाजी भक्त अशा अवतारातील पडळकर यांची ही छायाचित्रे पाहिल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button