breaking-newsताज्या घडामोडीपुणे
गदा ही पैलवानाच्या खांद्यावरच शोभून दिसते – उपमुख्यमंत्री अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/17-1.jpg)
पुणे |महाईन्यूज|
गदा ही पैलवानाच्या खांद्यावरच शोभून दिसते. दुसऱ्या कुणाच्याही खांद्यावर ती शोभत नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांचे स्वागत केले.
कात्रज येथे काकासाहेब कुस्ती संकुलात यंदाचा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि उप महाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.
राज्यात खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काय करता येईल यासाठी क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली असल्याचंही ते यावेळी म्हणालेत.