कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे पुण्यात 75 नवे मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर
![File charges against NCP mayors; Pune Mayor Muralidhar Mohol is aggressive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Murlidhar-Mohol.jpg)
कोरोनाच्या वाढत्या परिस्थिती बाबत बोलायच झाल तर मुंबईत 70 टक्के पेक्षा जास्त आता कोरोनाचं प्रमाण नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.मात्र पुणअयातली कोरोनाची चिंता अजून पर्यंत कमी झालेली दिसत नाहीये. महाराष्ट्रात सर्वाधिक ऍक्टिव्ह कोरोनाबाधितांचा संख्या ही पुण्यात आहे. पुण्यातील या कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर थोड्याच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुण्याचा दौरा केला. दरम्यान, पुणे प्रशासनानेही आता शहरातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पुणे शहरात ७५ नवे मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-2.jpg)
पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा आणि मृत्युदर कमी करण्यासाठी पुणे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, आता पुणेकरांना नियम पाळणे हे अत्यंत बंधनकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू नियम पुणेकरांनी न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ७५ कंटेन्टमेंट झोन्सबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.