Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
कोरोनाच्या भीती, पुण्यात 3 दिवस शाळा बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/5-12.jpg)
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी
पुण्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या पाचवर गेलीय. या सर्व कोरोनाग्रस्तांवर पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील तीन शाळा पूढील दोन-तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मांजरी परिसरातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल 11 मार्च ते 14 मार्च या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतलाय़. कात्रज, सिंहगड आणि नांदेड सिटी परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलाय.