breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कुणी गमंत करायचं विचार करत असेल, तर जमंतच करून टाकेन – अजितदादांचा इशारा

बारामती |महाईन्यूज|

‘दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असा प्रकार जर खपवून घेणार नाही. करायचं असेल तर उघड करा. पण, का कुणी गमंत करायचं विचार करत असेल तर जमंतच करून टाकेन, आता कुणाचं ऐकणार नाही. राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला पदे दिली आहे. त्यामुळे गद्दारी केल्यास लक्षात ठेवा’, असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पदाधिकार्‍यांना दिला.

निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगवी, पणदरे येथे सभा घेतल्या या वेळी पवार बोलत होते. यावेळी, अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये चौफेर फटकेबाजी केली. माळेगाव कारखाना चालवणार्‍या भाजपने जेव्हा बारामती, इंदापूरचे नीरा देवधर धरणातून मिळणारे पाणी बंद केले होते. नीरा डावा कालवाच्या पाण्याचा निर्णय जर मी घेतला नसता तर उन्हाळ्यात पिकांची धूळधाण झाली असती तुम्ही शेतकरी असला तर कारखाना ताब्यात द्या, पाच वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील, असं आश्वासन अजित पवार यांनी निरावागज इथं जाहीर सभेत दिलं.

तसंच, ‘तुम्ही शेतकरी असला तर कारखाना ताब्यात द्या, पाच वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील. नागरी सत्काराच्या वेळी मी सारे काही योग्य करेन, असे म्हटलं होतं. त्या पद्धतीने केलं अर्थात फलटण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला या कोणत्याही तालुक्यावर अन्याय केलेला नाही. आम्ही समन्यायी निर्णय घेतला सत्ता असतानाही शेजार धर्म पाळला आहे. जे कारखाना चालवतात त्यांनी तुमचे पाणी बंद केले होते. भाजपावाले बंद पाईप मधून पाणी आणणार असल्याची त्यांची कल्पना होती. मात्र, त्यामुळे पाणी अभावी पिके जळाली असती, पण आता तसं होणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button