मी कुठेही गेलेलो नाही, अजूनही राष्ट्रवादीमध्येच : विजयसिंह मोहिते पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/1-14.jpg)
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
मी कुठेही गेलेलो नाही, मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. मी पक्षासोबत आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच आहे, असेही मोहिते पाटील यांनी सांगितले आहे.
आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि त्यांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटील एकाच मंचावर आले होते.
या कार्यक्रमात बोलताना विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, मी अजूनही शरद पवारांसोबत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, याआधी (लोकसभा निवडणुकीनंतर) मी शरद पवारांना दोन-तीन वेळा भेटलो आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पवार- मोहिते राजकीय संबंध सुधारत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतले अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. त्याचदरम्यान मोहिते पाटीलही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जातील अशा, चर्चा होत्या.
तसेच मोहिते-पवार संबंध आता फार बरे नसल्याचे बोलले जात होते. परंतु आज मोहिते-पवार एकचा मंचावर दिसले. तसेच आपण पवारांसोबत असल्याचे सांगून मोहितेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.