कार्यकर्त्याला जपणारा नेता : युवा नेते पार्थ पवार यांनी ‘अशी’ जपली कार्यकर्त्याप्रति बांधिलकी!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/323F9393-CA4F-4DF8-A16C-4F925DB24418-1.jpeg)
पुणे । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा पार्थच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.मात्र यावेळी कोणत्या ट्विटमुळे नाही तर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मदत केल्यामुळे पार्थ पवार हे चर्चेत आले आहेत.
जालना जिल्ह्यातील गोरख साबळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने सोशल मीडियावर एक पोस्ट करून काम करत असलेल्या कंपनीने पीएफ रखडवला असल्यामुळे कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अशा आशयाची पोस्ट केली होती. पार्थ पवार यांनी या पोस्टची दखल घेऊन संबंधित कार्यकर्त्यांशी संपर्क करून मदतीचा हात पुढे केल्याचे दिसून आले.
माझा पीएफ मिळत नसल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय प्रचंड आर्थिक संकटात असल्याचे सांगितल्यानंतर पार्थ पवार यांनी लगेच त्याला दहा हजार रुपयाची मदत देऊ केली. व एक-दोन दिवसांमध्ये पीएफ रखडवलेल्या खाजगी कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत बोलून पीएफ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पार्थ पवार यांच्याकडून देण्यात आले. कार्यकर्त्याप्रति बांधिलकी जपणारा युवा नेता म्हणून पार्थ पवार यांचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे.