‘काकां’मुळे सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय लागली – अजित पवार
!['Uncle' made it a habit to get up early in the morning and work - Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/71343938.jpg)
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते अगदी पहाटे पहाटे कामाला सुरुवात करतात, याची आता बहुतेकजणांना माहिती झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर सकाळी उठून दौरे, बैठका देखील घेतात. शरद पवारांची हीच सवय इतर नेत्यांमध्ये देखील पाहण्यास मिळते. शरद पवारांचा हाच गुण आपण घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सकाळी लवकर उठण्याची सवय आजोबांची नाही तर चुलत्याची लागली आहे. आम्ही जस बघतोय तस चुलते 27 वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. रात्री दोनला आले तरी सकाळी सात ला काम सुरूच. आता वय वर्ष 80 पूर्ण झालं. तरी देखील आजही सकाळ पासून कस साहेब काम करत असतात, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या सकाळी लवकर उठण्याच्या सवयीचा उल्लेख केला.अजित पवार म्हणाले की, शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर अवलंबून असतं. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण देखील स्वछ असतं. एक, उत्साह असतो.