breaking-newsताज्या घडामोडीपुणे
ऍड. नानासाहेब नलावडे यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
![Adv. Enthusiasm among activists with the election of Nanasaheb Nalawade](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/pp.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी ऍड. नानासाहेब नलावडे यांची निवड झाली. पक्ष वाढीसाठी प्रामाणिक काम केल्याने त्यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, वंदना चव्हाण, शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे यांनी हि जबाबदारी दिली आहे. आगामी काळात पक्ष वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन या वेळी ऍड. नलावडे यांनी केले. दिलेल्या संधीमुळे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ताकद मिळेल असे प्रतिपादन त्यांनी केले. तर त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र आहे.