breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

उपमुख्यमंत्री अजित पवारांना आठ बहिणींनी अशा दिल्या शुभेच्छा

बारामती – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस होता. अजित पवार यांच्या वाढदिवसाला त्यांच्या बहिणींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळे यांनी याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात अजितदादांना भेटून देऊ शकलो नाही, त्यामुळे आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार घेतल्याचं सुप्रिया सुळे या ट्विटमध्ये म्हणाल्या.

अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुप्रिया सुळे, प्रफुल्ला भोसले, रजनी इंदूलकर, विजया पाटील, निमा माने, निता पाटील, शमा पवार आणि अश्विनी पवार उपस्थित होत्या. अजित पवारांबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आज वाढदिवस आहे. अजित पवारांनी ट्विटरवरून फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांनीही मग लगेचच अजितदादांच्या ट्विटला रिप्लाय देत त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button