उद्धव ठाकरेंनंतर सोलापूर जिल्ह्यात आता मोदींची सभा होणार!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/download-21.jpg)
सोलापूर – 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच निवडणूक प्रचाराच्या कामाला लागल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 9 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती भाजप खासदार अमर साबळे यांनी दिली. आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंढरपूर भेट आणि आता मोदींचा सोलापूर दौरा यामुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.
सोलापुरातील विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 30 हजार घरकुलांचं हस्तांतरण, स्मार्ट सिटीच्या कामाचं उद्घाटन, 180 कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेचे उद्घाटन, देहू-आळंदी पालखी मार्गाचे भूमीपूजन, तुळजापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचे भूमीपूजन अशा विविध कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे.