Breaking-newsपुणे
इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील १२ जण करोना पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/images-10.jpeg)
सांगली: इस्लामपूर येथे कुटुंबातील चौघाजणांमुळे इतर आठजणांनाही करोनाची लागण झाली असून या कुटुंबातील १२जण करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती उघड आली आहे. या १२ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
२३ मार्च रोजी सांगलीच्या इस्लापूर येथील एकाच कुटुंबातील चार जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. २५ मार्च रोजी या कुटुंबातील आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर एक दिवसाने या कुटुंबातील आणखी तिघांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. सध्या या कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाली असल्याचं उघड झालं आहे. यातील ११ जण इस्लामपूरमध्ये राहतात. पेठवाडगावात एक जण राहतो. विशेष म्हणजे हे चारही जण सौदी अरेबियातून हज यात्रेवरून आले होते.
.