आमचा ‘डीएनए’च विरोधी पक्षाचा आहे – विधान पक्षनेते प्रविण दरेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-3.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
भाजप कधीही सत्तेसाठी लाचार नाही, सत्तेसाठी पक्षाच्या मूळ विचारधारेशी कधीच सोडत नाही. आम्ही सत्तेसाठी तडफत आहोत, ही सत्ताधाऱ्यांची टीका चुकीची असून, आमचा ‘डीएनए’च विरोधी पक्षाचा आहे. तर काँग्रेस सत्ता हेच आॅक्सिजन असून सध्या ते टवटवीत झाले आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांना लावला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरेकर यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम रविवारी झाला. दरेकर म्हणाले, शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व, मराठी भाषा, अस्मिता सोडून दिली आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. राज्यात सत्तेवर आलेली महाविकास आघाडी अनैसर्गिक आणि अभद्र आहे.
सत्तेवर येण्यापूर्वी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन प्रत्येक शेतकºयांना किमान २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देऊन, शेतकºयांचे कर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांना ही आश्वासने पूर्ण करण्याची चांगली संधी होती. परंतु, अवकाळीग्रस्त शेतकºयांना तुटपुंजी मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तसेच २ लाखांची खर्च माफीची घोषणाकरुन शेतकºयांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि अस्मितेच्या आड आल्यास सत्ताधाºयांना जाब विचारण्याचे काम करू, असे दरेकर यांनी सांगितले.