breaking-newsपुणे

आगामी विधानसभा निवडणुकीत जुन्याना संधी देणार : रावसाहेब दानवे

चंद्रकांत खैरे आणि मी जुने मित्र असून खडसे आमचे विरोधी पक्षनेते, ते फाउंडर सदस्य आहे. तर आम्ही पक्षची ताकद वाढविण्यासाठी बाहेरचे काही लोक घ्यावी लागतात. त्या प्रमाणे पक्षात घेतले आहे. अशी भूमिका प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. तर विधानसभा निवडणुकीत इतर पक्षातील येणार्‍या थांबवले असून जुन्याना संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तारा वरून जाहीर नाराजी व्यक्त केली. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, देशभरात लोकसभा निवडणुकीत 300 चा आकडा भाजपने पार केला असून काँग्रेस भुईसपाट झाली. तर राष्ट्रवादी काही आकडा गाठू शकली नाही. अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष रावसाहेब यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तर आता आम्ही 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत.

तसेच ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच यंदा आम्ही दिसतोय फरक शिवशाही परत, ही यात्रा मी आणि मुख्यमंत्री काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तिवरे धरण हे खेकड्यामुळे फुटले असल्याचे मंत्र्याकडून सांगितले. अशा विधानावर कारवाई होणार का त्या प्रश्नावर ते म्हणाले की, धरण फुटीवर तज्ञ तपास करुन निष्कर्ष काढतील असे सांगत संबधित मंत्र्या च्या विधाना बाबत बोलणे टाळले.

पुणे जिल्ह्यातील भाजपच्या आमदाराच्या सर्व्हे बाबत अनेक वेळा चर्चा होत असते. त्यातील काही जणांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळणार या प्रश्नावर ते म्हणाले की, आतापर्यंत एकही आमदाराचा कामगिरी खराब नसल्याचे त्यांनी सांगितले. तर आता नुकत्याच लोकसभा निवडणुकीत अनेक वयाच्या 75 नंतरच्या ज्येष्ठ खासदारांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढच्या वेळी बापट हे पण कदाचित निवडणूक लढवणार नाही. असा गौप्यस्फोट त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button