breaking-newsताज्या घडामोडीपुणेलेख

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी ‘हॉट डेस्टीनेशन’?

महाईन्यूज । लोकसंवाद । अधिक दिवे

‘पुणे : शिक्षणाचे माहेरघर’ अशी शहराची ओळख निर्माण झाली.  त्यात पुणे विद्यापीठाचा अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाटा मोठा आहे. पुणेकरांचा स्वाभीमान आणि अभिमान असलेल्या या विद्यापीठाची स्थापना दि. १० फेब्रुवारी १९४९ म्हणजे तब्बल ७१ वर्षांपूर्वी करण्यात आली. देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या पसंतीचे ठिकाण म्हणजेच ‘हॉट डेस्टिनेशन’ असलेल्या विद्यापीठाचा आज स्थापना दिवस त्यानिमित्ताने विद्यापीठाबाबत जाणून घेवूयात काही खास माहिती…

ज्ञानाचे संरक्षण, निर्मिती, प्रगती आणि प्रसार या दृष्टीने जागतिक दर्जाचे आणि सामाजिक जाणीवयुक्त उत्कृष्ट गुणवत्तचे केंद्र निर्माण व्‍हावे. देशाच्या आर्थिक, तंत्रज्ञानातील आणि सामाजिक विकास व प्रगतीमध्ये भरीव योगदान करण्यासाठी आमच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना समर्थ बनवणे, या उद्दिष्टाने विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

अध्यापन, संशोधन आणि विस्तारित उपक्रमांसाठी चैतन्यपूर्ण ज्ञानकेंद्र आणि उत्कृष्ट गुणवत्तेचे केंद्र बनणे. ज्ञानाचे संरक्षण, निर्मिती, प्रगती आणि प्रसार घडवणे. मूल्याधिष्ठित आणि उच्च दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक संशोधन आणि सामाजिक व प्रादेशिक घटकांचा स्थान व प्रतिष्इ या गोष्टी साध्य करुन विविध क्षेत्रांत तंत्रज्ञानाची जाण असलेले वैचारिक आणि कृतिशील नेतृत्व घडवणे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांना आकर्षित करुन आणि नामवंत शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यातून शैक्षणिक उपक्रम राबवून जागतिक संपर्क वाढवणे, असे ध्येय विद्यापीठ प्रशासनाने ठेवले आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बोधचिन्ह…

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याचे सत्ताधीर असलेल्या पेशवे यांचा राजवाडा पुणे विद्यापीठाच्या कमलाकार-बोधचिन्हाच्या मध्यभागी आहे. बोधचिन्हाच्या तळाच्या दोन्ही कोपऱ्यांतील मराठी साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ला आणि पुण्यातील सगळ्यात महत्त्वाची पवित्र आणि ऐतिहासिक वास्तू असलेली पर्वती यांचा समावेश केला आहे. दोन एकमेकींच्या विरुद्ध दिशेत तलवारी मांडलेल्या असू, त्यांच्या बाजूला हत्तीची डोकी आणि लेखण्या आहेत. शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजूंना दोन उभ्या घोड्यांनी पुस्तक धरले असून, त्यावर ‘पुणे विद्यापीठ’ आणि १९४८ हे स्थापना वर्ष कोरले आहे.  पुस्तकाच्या खाली दोन्ही कोपऱ्यांत दोन स्वस्तिके असून, बोधचिन्हाच्या तळाशी ‘य: क्रियावान्‌ स पण्डित:’ हे विद्यापीठाचे बोधवाक्य या क्रियावान्‌ शब्दावर अधिक भर दिते. क्रियावान्‌ म्हणजे जो क्रिया करण्यासाठी धाडस करतो, आणि जो समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करतो, तो खरा पंडित असतो.

सध्या पुणे विद्यापीठ हे भारतातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. पुणे विद्यापीठात पुणे, अहमदनगर, नाशिक या महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे विद,यापीठातील महत्त्वाचे शैक्षणिक कार्यक्रम व विद्यापीठाने पुरविलेल्या सुविधांमध्ये पारंपरिक व अत्याधुनिक अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. चारशेहून अधिक शैक्षणिक कार्यक्रम विविध प्रकारे व शिस्तबद्धरीत्या पदवीधर व पदव्युत्तर पातळीवर राबवले जातात. पदव्यूत्तर पातळीवर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची व त्यांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. खरे तर भारतात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुणे विद्यापीठ हे पहिल्या पसंतीचे विद्यापीठ आहे.

जगातील सर्वात मोठे विद्यापीठ…

‘नॅक’ ने पंचतारांकित विद्यापीठ म्हणून गौरविल्यामुळे आणि विद्यापीठाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे University with Potential for Excellence (UPE) लाभलेली प्रतिष्ठा इत्यादी कारणांमुळेच पुणे विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या गौरवास पात्र ठरले आहे. आज पुणे विद्यापीठ जगातील सर्वांत मोठे विद्यापीठ आहे, कारण या विद्यापीठात ५ लाख विद्यार्थी शिकत आहेत. ५७ पदव्युत्तर विभाग आणि संशोधन केंद्रे, त्याचबरोबर ६ आंतरविद्याशाखीय केंद्रे, ६१३ पदवी महाविद्यालये आणि २२८ संस्था व १९८ पदव्युत्तर केंद्रे विद्यापीठाशी संलग्न आहेत.

पुणे विद्यापीठाचे नामांतर… क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. विद्यापीठाचे नामांतरण ही महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी नवीन गोष्ट नाही. नवीन विद्यापीठाच्या घोषणेनंतर साधारणपणे त्या शहराचे किंवा भौगोलिक नाव देण्यात येते. कालांतराने ठराविक समाजाची मागणी किंवा आंदोलनाची दखल घेऊन नामांतर केले जाते. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी १८४८ साली भिडे वाडा येथे सुरु केलेल्या शाळेने स्त्रियांना शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्या काळच्या समाजात स्त्रियांना नवयुगाची पहाट दाखवणाऱ्या सावित्रीबाईंंसारख्या असामान्य व्यक्तीमत्वाचे नाव २०१४ साली पुणे विद्यापीठला देऊन विद्यापीठाचा गौरव केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button