अॅसिड फेकायची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
![Sexual intercourse against the will of the young woman, filing a crime against the young man](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/crimes-against-women_26eacdd2-7115-11e9-bdc8-80f5902ed91b.jpg)
पुणे महाईन्यूज
अॅसिड फेकायची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलगी इंग्रजी माध्यमातल्या शाळेत शिकतेय. आरोपी हा तिच्या शाळेबाहेर उभा राहून रोज तिचा पाठलाग करत असे. त्याच बरोबर तो अॅसिड हल्ल्याची धमकी देत होता.
आरोपी हा मुलीला शाळेबाहेर गाठून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. मात्र मुलगी प्रतिसाद देत नसल्याने तो तिला त्रास द्यायचा. एक दिवस त्याने तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवलं आणि वाघोली परिसरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
त्याचा त्याने व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करत असे. कुणाला सांगितलं तर कुटुंबीयांनाही ठार करेल अशी धमकीही त्याने दिली होती. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने ही माहिती पालकांना सांगितली आणि पालकांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.