breaking-newsताज्या घडामोडीपुणे
अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडले
![Amazon's Pune office blown up](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/raj-vs-amazon.jpg)
पुणे – मनसे आणि अॅमेझॉनमधील वाद चिघळत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस आल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.
वाचा :-पंतप्रधान मोदींनी दिल्या इंदापूरमधील नवदाम्पत्याला शुभेच्छा
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.