अबब.. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जाहिरात खर्च कोटींच्या घरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/2-2.jpg)
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सरकारी तिजोरीतून रोजच्या जाहिरातीवर ८५ हजार रुपये खर्च केल्याची बाब समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
देंवेद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रीय जाहिरातींचा खर्च वगळता दूरचित्रवाणी आणि रेडिओ वाहिन्यांवर दिल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षांत दिवसाला ८५ हजार रुपये खर्च केला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/unnamed-file.jpg)
फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१५-१६मध्ये दीड कोटी रुपये, २०१६-१७ ला ९१ लाख ६० हजार रुपये, २०१७-१८ला ७ कोटी २१ लाख रुपये, २०१८-१९ला ४ कोटी ७० लाख रुपये, तर २०१९-२०मध्ये ९५ लाख ७ हजार रुपये असा एकूण १५ कोटी २८ लाख ८३ हजार रुपये खर्च सरकारी तिजोरीतून झाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.