अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर,26 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/clg-addmission.jpg)
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे निकाल रखडले असले, तरी अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे . यानुसार 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.
पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारुप Mock.Demo.Registration या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी आणि पालकांना अचूकपणे अर्ज भरण्यास मदत होणार आहे.