breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

प्रणिती शिदेंचं भाजपचे उमेदवार राम सातपुतेंना पत्र, सोशल मीडियावर चर्चा

सोलापूर | भाजपाची पाचवी यादी काल जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रातली तीन नावं आहेत. ४८ जागांपैकी महाराष्ट्रात भाजपाने २३ जागांवर दावा सांगितला आहे. सोलापूर मतदारसंघातून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे विरूद्ध भाजप नेते राम सातपुते असा सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना पत्र लिहिलं आहे.

प्रणिती शिंदेंनी पत्रात काय म्हटलं?

मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते.

हेही वाचा    –    ‘भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’; बच्चू कडूंचं विधान

लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकसा हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे.

पुढील ४० दिवस भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button