breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Kalki 2898 AD | प्रभासच्या ‘कल्कि २८९८ एडी’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Kalki 2898 AD | दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सध्या ‘सालार’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. अशातच आता प्रभास पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवण्यास सज्ज झाला आहे. प्रभासचा ‘कल्कि २८९८ एडी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित हा सिनेमा ९ मे २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘कल्कि २८९८ एडी’ या सिनेमात प्रभास आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि कलम हासनदेखील या सिनेमाचा भाग असणार आहेत.

हेही वाचा    –    ‘युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल’; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

गेल्या काही दिवसांपासून सिनेप्रेमी आणि प्रभासचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र प्रेक्षकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button