युवकांनी लोकशाही मूल्य जपत अन्याय, अत्याचाराविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे: इम्रान शेख
पिंपरी: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कासारवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.कासारवाडी प्रभाग अध्यक्ष शाहिद शेख आणि युवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 होय. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे.भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम आज युवकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.सर्वांनी लोकशाही मूल्य जपली पाहिजेत आज आपण स्वातंत्र्य आहोत. कोणत्याही परिस्थितीत अन्याय आणि अत्याचार सहन करू नका. त्याला वेळीच प्रतिरोध करा. कारण आज आपण गप्प बसलो तर लोकशाहीला विरोध करणारे कधी आपल्यावर राज्य करतील हे कळणार नाही. आपल्यातील न्यायाची ज्योत पेटत राहू द्या.अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजेत. मगच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल”.
यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख,ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे, युवक शहर उपाध्यक्ष ओम शिरसागर, सरचिटणीस विकास कांबळे सय्यद नदाफ, सचिव अमोल बेंद्रे निलेश लोंढे मुजम्मिल शेख शाहिद शेख,आकिब अत्तार,वसीम शेख,अब्दुल खान,महेश यादव,सतीश यादव,शोएब हप्सी,अतीक अत्तार, आज़म शेख,शशांक गावटे,अनीस सैय्यद अफ़सर पठान आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.