breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

लिहून ठेव एक दिवस तू महान ऑलराउंडर होशीलः योगराज सिंग यांची अर्जुन तेंडुलकरबाबत प्रतिक्रिया…

नवी दिल्ली । महाईन्यूज ।

प्रत्येक गुरूला अभिमान वाटतो जेव्हा त्याचा शिष्य एखादी चांगली काही तरी कामगिरी करतो. असाच काहीसा अनुभव भारताचा माजी क्रिकेटपटू आणि स्टार ऑलराउंडर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांना झाला, जेव्हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणातच धमाकेदार शतक झळकावले.

अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक केले. त्याच्या या कामगिरीनंतर योगराज यांनी मेसेज करून मोठी प्रतिक्रिया दिली आहे. योगराज म्हणाले, लिहून ठेव एक दिवस तू महान ऑलराउंडर होशील.

काही महिन्यांपूर्वीच माजी जलद गोलंदाज, अभिनेता आणि प्रशिक्षक असलेल्या योगराज सिंह यांनी अर्जुनला ट्रेनिंग दिले होते. त्यानंतर अर्जुनने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. त्यामुळेच असे म्हटले जात आहे की, अर्जुनला योग्य गुरू मिळालेत. योगराज हे फार कडक शिस्त असलेले प्रशिक्षक असल्याची चर्चा आहे. युवराज सिंगला ऑलराउंडर करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. आता अर्जुनने राजस्थानविरुद्ध गोव्याकडून खेळताना पदार्पणाच्या सामन्यात शतक केले आणि ऐतिहासिक यादीत नाव नोंदवले.

योगराज म्हणाले, सप्टेंबर महिन्यात मला युवराजचा एक मेसेज आला. त्यात म्हटले होते की अर्जुन दोन आठवड्यांसाठी चंदीगढ येथे तुमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहे. अशी विनंती स्वत: सचिनने केली आहे. अर्जुनसाठी तुमच्याकडे वेळ आहे का असे युवीने मला सांगितले. मी सचिनला नकार देऊ शकत नाही. तो माझ्या मोठ्या मुलासारखा आहे.
अर्जुनला ट्रेनिंग देताना माझी एकच अट होती. मी युवीला सांगितले की, तुला माझी पद्धत माहिती आहे. मी कशा प्रकारे ट्रेनिंग देतो आणि त्यात कोणी हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button