breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

“…तर मी आतंकवादी आहे,” वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात असे का म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त ष्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाते आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, “जर लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करणे आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे.”

दरम्यान या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना झोडपून काढले.

आपल्या भाषणात ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत समाजसेवी संस्था, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी, निखिल वागळे आणि ध्रुव राठीसारख्या युट्युबर्सनी आमचा प्रचार केला. त्यांनी लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. या लोकांना एकनाथ शिंदे याला शहरी नक्षलवाद म्हणत आहेत. हे लोक संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तो तुम्हाला नक्षलवाद आणि आतंकवाद वाटतो? आणि लोकशाही वाचवणे हा आतंकवाद वाटत असेल तर हो मी आतंकवादी आहे.”

हेही वाचा      –   पुणे जिल्ह्याचे सात खासदार; ‘रेड झोन’ चा प्रश्न सोडवण्यासाठी वज्रमूठ करतील काय? 

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरी जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जगात तुम्ही काहीही करू शकता. मी यांना हरवू शकतो हा झाला आत्मविश्वास आणि मला कोणीही हरवू शकत नाही हा झाला अहंकार. जो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहे.”

यावेळी उपस्थितांना प्रश्न करत ठाकरे म्हणाले, ” निवडणूक संपल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे की उद्धव ठाकरे एनडीएत जाणार आहेत. आपल्याला ज्या लोकांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जायचे का?”

दरम्यान शिवसेना फुटल्यानंतर झालेल्या पहिल्याच मोठ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेने सर्व पक्ष रिकामा झाला असताना 9 जागांवर विजय मिळवला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही समाधानकारक कामगिरी करत 7 जागी विजयी पताका फडकवली.

गेल्या दोन वर्षांत राज्यात झालेल्या सर्व राजकीय घडामोडींचा भाजपला मात्र, चांगलाच फटका बसला. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणारी भाजपची गाडी यंदा मात्र 9 जगांवरच अडकली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button