breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

मोदी वयाच्या पंच्चाहत्तरीनंतर पंतप्रधान राहणार नाही, कुणी केला हा सर्वात मोठा दावा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाला लागला असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असं असलं तरी भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. बहुमतापासून दूर असल्याने भाजपला इतर मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. पंतप्रधान मोदी लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार असून येत्या ८ जून रोजी शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाची निवडणूक ही फारच वेगळी ठरली. एक्झिट पोलचे आकडे देखील चुकीचे ठरले आहेत.

अनिल थत्ते यांनी देखील निवडणुकीच्या या चित्रावर आपलं मत सांगितलं आहे. ते म्हणाले की, ‘रामलल्लाचे बोट धरून जाणारे अवतारी पुरुष मोदी नाहीत. रामाने अनेकांचे बोट धरून घेऊन गेले. मात्र तुम्ही रामाचे बोट कसे धरून जाताय हे अंगलट आलं. त्यामुळे त्यांचा हा पराभव झाला. रामापेक्षा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला गेले. राम दाखवले मात्र तुम्ही स्वतःचे दर्शन घडवलं हे लोकांना आवडले नाही.’

‘संविधान मधील काही कलमे त्यांना बदलायचे होते. त्यामुळे दलित आणि मुस्लीम हा फॅक्टर परिणामकारक झाला. अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस यांच चॉईस नव्हतं. अजितदादा हे लादलेल ओझं होतं. राज ठाकरे यांच्यामुळे काय प्लस झालं मायनस झालं. अजित पवार यांना स्वतःच्या पत्नीला निवडून आणता आले नाही. अजितदादांच्या सीट ह्या भाजपकडे पाहिजे होत्या. अजित दादांचा पक्ष मोठ्या प्रमाणात फुटणार. मला जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं अजित पवार यांचे निम्मे लोक आमच्या संपर्कात आहे ते कधीही फुटतील. हे माझ्या मनाच नाही.’

‘फडणवीसांच्या विरोधातली लॉबी स्ट्रॉंग आहे. त्यांना वाटतं फडणवीस जावे. फडणवीस सर्वांना डोही जड झाले आहे. ते एकटे स्वतःला मिनी मोदी समजत आहेत. फडणवीस स्टंट करणारे आहेत.’

‘सुप्रिया सुळे विजयी झाल्यात. कारण तेथे भाजपने सुनेत्रा पवार यांचं काम केले नसेल. भाजपने विरोधात काम केले आहे. नितीश कुमार पलटूराम आहेत. पहिले ते पलटी मारून जातील. 2014 साली NDA मध्ये असताना UPA मध्ये प्रस्ताव मांडला होता हे दोघेही बिन भरवसे आहे. हे सरकार पडेल असे वाटतेय.’ असं ही ते म्हणालेत.

मोदी पंतप्रधान राहणार नाहीत

‘मोदी 75 नंतर पंतप्रधान राहणार नाही. मोदी सीट आणतील आता तो विश्वास राहिलेला नाही. महाघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील. फडणवीस यांना चिंतन नाही तर चिंता करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने मदत केली नाही. आत्मपरीक्षण भाजपने कधीच केलं नाही. फडणवीस यांच्या विरोधात अनेक लोक आहेत.’

‘नरेश मस्के जिंकले नाही तर एकनाथ शिंदे जिंकले आहेत. नरेश मस्के यांना या लोकसभेत काहीच महत्त्व नाही. एकनाथ मॅजिक चालल म्हणून नरेश मस्के निवडून आले. नारायण राणे यांची पुण्याई स्वतःला तारून गेली म्हणून ते जिंकले.’

‘मी अमोल कीर्तीकर यांनाच विजय मानतो. कारण अमोल कीर्तीकर फक्त खिचडी मध्ये होते. वायकर मात्र अनेक ठिकाणी भ्रष्टाचारी होते. अनेक फायदे त्यांनी ठाकरेंकडून करून घेतले आहेत.’ असं ही अनिल थत्ते यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button