breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सांगलीचा खासदार कोण? बुलेट आणि युनिकॉर्नची पैज

Sangli Lok Sabha Election | सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत ही यंदा चांगलीच लक्षवेधी ठरली. सांगलीमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झालं. त्यानंतर आता सांगलीचा नवा खासदार कोण होणार? याची चर्चा सांगलीकरांमध्ये रंगत आहे. ही चर्चा फक्त शाब्दिक पातळीवर राहिली नसून त्यासाठी लागलेली एक पैज सध्या चांगलीच गाजतीय.

सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील दोघांमध्ये एकमेकांना वाहनं देण्याची पैज लागली आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले, तर एकाने आपली युनिकॉर्न गाडी देईन अशी पैज लावलीय. तर भाजपा उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देईन अशी पैज लावलीय.

हेही वाचा    –      Pimpri-Chinchwad | लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असे पैज लावलेल्यांची नावे आहेत. विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. या पैजेसाठी काही जणांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव आणि स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोण ही शर्यत जिंकणार हे येत्या ४ जूनला स्पष्ट होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button