फुगीर बेडकाची उपमा देऊन अजित पवारांनी नेमका कोणाचा प्रचार केला, काटे की कलाटे? चिंचवड मतदार संघात चर्चेला उधाण
![Who exactly did Ajit Pawar promote by giving the simile of a puffy frog, kate or kalate? Discussion in Chinchwad Constituency](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Rahul-Kalate-4.jpg)
- कोणाला किती मते मिळणार? जनता ठरवेल, नेते नाही – राहुल कलाटे
चिंचवड : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांचे उमेदवार नाना काटे यांच्या नव्हे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार करत आहेत. त्यांनी भाषणात राहुल कलाटे यांचेच नाव घेतले. शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटेंवर सडकून टीका केली होती. अजित पवारांनी कलाटे यांना फुगीर बेडकाची उपमा दिली होती. त्यांना राहुल कलाटे यांनी उत्तर दिले आहे. अजित पवार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही, ते महान नेते आहेत. या महान नेत्याने महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि विकासकामांवर भाष्य करावे, अशी पिंपरी चिंचवड शहरातील जनतेची अपेक्षा आहे. अजित पवारांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याबद्दल बोलून स्वतःला कमी लेखू नये. चिंचवडच्या जनतेचा प्रश्न आहे, तर तिच्या मताला दुखापत झाल्यामुळे त्या सगळ्यांची बोलती बंद करणार आहेत. माझ्या शहराचा आवाज जनता ऐकत असून 26 फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी फक्त शिट्टीच वाजणार आहे. अशा जोरदार शैलीत राहुल कलाटे यांनी उत्तर दिले.
महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत अजित पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांनी कलाटे यांची तुलना फुगलेल्या बेडकाशी केली. त्याचे उत्तर राहुल कलाटे यांनी दिले आहे. चिंचवडची जनता मला विजयाने उत्तर देईल. राष्ट्रवादीने वंचितांसाठी आधार मागितल्याचे मला माहीत नाही. मात्र राहुल कलाटे यांना उमेदवारी द्यावी, असे खुद्द प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मीच योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य तो निर्णय घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मला किती मते मिळणार हे चिंचवडची जनता ठरवेल, कोणते नेते ठरवणार नाहीत.