breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी

Union Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेकविध क्षेत्रासाठी तरतूद जाही केली असून रोजगारासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठीही अनेक योजना सादर केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त झालं, काय महाग झालं त्याची यादी पाहूया.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व प्रकारच्या पिकांची हाय मिनिमम सपोर्ट प्राईस (किमान आधारभूत किंमत किंवा हमीभाव) ठरवली आहे. यामुळे शेतकऱ्याला त्याने केलेल्या खर्चावर ५० टक्के अधिक किंमत मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोबाईल फोन व चार्जरवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मोबाईल फोन व चार्जर्स स्वस्त होतील.

काय स्वत होणार?

सोनं, चांदी स्वस्त होणार
सोनं-चांदीवर ६.५ टक्के ऐवजी ६ टक्के आयात कर
मोबाईल हँडसेट
मोबाईल चार्जरच्या किंमती १५ टक्क्यांनी कमी होणार

हेही वाचा      –      प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांना पत्र, आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण!

मोबाईलचे सुटे भाग
कॅन्सरवरची औषधे
पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
लिथियम बॅटरी स्वस्त
इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार
सोलार सेट स्वस्त होणार
चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
पीवीसी फ्लेक्स बॅनर
विजेची तार

काय महाग होणार?

प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार
प्लास्टीक उत्पादने महाग होणार

कॅन्सरची औषधे स्वस्त होणार

अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरच्या औषधावरील आयार कर करण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, औषध आणि वैद्यकीय कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी ३ औषधांवरील आयात कर पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे, एक्स-रे ट्यूबवरील शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. यानंतर देशात कॅन्सरवरील तीन औषधे स्वस्त होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button