‘अजित पवारांना पश्चताप होतोय..’; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
![Vinayak Raut said that Ajit Pawar is feeling remorse](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Uddhav-Thackeray-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. अजित पवार आजारी असताना दिल्ली गाठल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
विनायक राऊत म्हणाले, अजित पवारांना पश्चताप होतोय, त्या पश्चातापातून कसं मुक्त व्हायचं याकरता ते विचार करत आहेत. अजित दादा स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देण्याचं काम ठाकरेंनी केलं होतं. परंतु, आता त्यांची गळचेपी होत असल्याचं प्रत्येक विधानातून दिसून येतंय.
हेही वाचा – विठ्ठल भक्तांना दिलासा! २४ तास घेता येणार विठुरायाचे दर्शन
मागच्या आठवड्यातही दिल्लीला जाऊन अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदेंचं विसर्जन झाल्यावर (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ संपल्यावर) आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी केल्याची माहिती आहे, असंही विनायक राऊत म्हणाले.