‘शरद पवार सोबत आले तरच अजित पवार मुख्यमंत्री, मोदींची अट’; काँग्रेस नेत्याचा दावा
![Vijay Wadettiwar said that Ajit Pawar will be the Chief Minister only if Sharad Pawar comes along](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/ajit-pawar-and-sharad-pawar-780x470.png)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली. यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांनीही या गुप्त भेटीवर नाराजी व्यक्त केली. भीष्म पितामहा यांना असे वर्तन शोभत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. दरम्यान, या भेटीवरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्हाला अशी माहिती मिळत आहे की, या देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांनीच अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र, एक अट मोदींनी घातली. शरद पवार भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, असे मोदींनी अजितदादांना सांगितले आहे. शरद पवार भाजपसोबत आले नाहीत तर तुम्हीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बाळगू नका.
हेही वाचा – ‘इरशाळवाडीवासियांचे सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार’; एकनाथ शिंदे
JUST IN | Leader of Opposition Vijay Wadettiwar on ‘secret’ Sharad Pawar-Ajit Pawar meet in Pune: “It is said that #PMModi has apparently made this condition to Ajit that only if Sharad Pawar comes over to the #NDA, can he be the CM of Maharashtra. Hence, Ajit Pawar has been…
— The Hindu (@the_hindu) August 16, 2023
अजित पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यामुळेच मोदींची अट पूर्ण करण्यासाठी ते वारंवार शरद पवारांची भेट घेऊन त्यांना भाजपसोबत येण्याची विनंती करत आहेत. भाजपसोबत चला म्हणून दया याचना करत आहेत, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कुणीही मनात संभ्रम बाळगू नये, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मात्र तरी ठाकरे गट व काँग्रेसने मात्र राष्ट्रवादी सोबत आली नाहीच तर भाजपविरोधात लढण्यासाठी बी प्लॅन तयार ठेवल्याचे वृत्त आहे.