breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
ठरलं तर! महाविकास आघाडीची पुण्यात होणार वज्रमूठ सभा
![Vajramooth meeting of Mahavikas Aghadi will be held in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/mahavikas-aghadi--780x470.jpg)
पुणे : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला तह देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. काही दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. त्यानंतर नागपूरला दुसरी सभा पार पडणार आहे. तर मे महिन्यात पुण्यात देखील ही सभा होणार आहे.
पुण्यात होणाऱ्या वज्रमुठ सभेचे ठिकाण ठरलं असून शहरातील नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. ही सभा १४ मे रोजी रविवारी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सभेवरून अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले. कारण या सभेचे नियोजन उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे होते. या सभेचे नेतृत्व कोणाकजे असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.