breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजितदादांनाच ‘राष्ट्रवादी’ पक्षातून काढून टाकू शकतो; ‘या’ नेत्याने दिला इशारा

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. बारामतीत नणंद-भावजय अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच नुकताच अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या उत्तम जानकरांनी थेट अजितदादांनाच इशारा दिला आहे.

मला अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही. मी देखील दररोज विचारत आहे की, मला पक्षामधून काढले का? कारण पक्षाचा संस्थापक सदस्य मी पण आहे. मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो. कारण मी पक्षाचा सदस्य आहे. शरद पवारांना अजितदादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकर अजित पवारांना काढायला अडचण काय? काढू शकतो, असं उत्तम जानकर म्हणाले. ते माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

हेही वाचा    –      ‘स्वत:ची अटक टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले’; संजय राऊतांचं विधान 

दरम्यान, उत्तम जानकरांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. मात्र, भाजपाच्या पाठिंब्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. त्यानंतर काही दिवसांतच उत्तर जानकरांनी शरद पवार गटात प्रवेश केला. तसेच आपण माढ्यात शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button