‘मशीद तोडून मंदिर बांधलं जात असेल, तर..’; उदयनिधी स्टॅलिन यांचं विधान चर्चेत
![Udhayanidhi Stalin said that if a temple is being built after demolishing a mosque, we will not support it](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Udhayanidhi-Stalin-780x470.jpg)
Udhayanidhi Stalin | अयोध्येतील नव्यानं उभारलेल्या श्री राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मोठं विधान केलं आहे. मशीद तोडून मंदिर बांधलं जात असेल, तर त्याचं आम्ही समर्थन करनार नाही, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
उदयनिधी स्टॅलिन नेमकं काय म्हणाले?
द्रमूक कुठल्याही धार्मिक श्रद्धेच्या विरोधात नाही. पण, मशीद तोडून तिथे मंदिर बांधलं जात असेल, तर त्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.
हेही वाचा – पुणे ते अयोध्या १५ विशेष ट्रेन सुरु होणार; कधी अन् केव्हा? जाणून घ्या सविस्तर..
यापुर्वीही उदयनिधी स्टॅलिन यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.