‘सावरकर आमचे दैवत त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही’; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा
रावण धनुष्य घेतांना उताणा पडला तिथे हे मिंधे कोण?
![Uddhav Thackeray said that we will not accept the insult of Savarkar, our god](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/rahul-gandhi-and-uddhav-thackeray-2-780x470.jpg)
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यानंतर राहुल गांधी यांनी भाजपावर परखड शब्दात हल्लाबोल केला. मात्र, यावेळी त्यांनी सावरकरांबद्दल वक्तव्य केलं. यावरून आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.
काल राहुल गांधींची पत्रकार परिषद. हिडनबर्गने घोटाळे काढले पण त्याकडे लक्ष नाही. राहुल गांधींना जाहीर सांगतो सावरकर आमचे दैवत त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो. अष्टभुजेसमोर शपथ घेणारे सावरकर. १५ व्या वर्षी ही सावरकरांची शपथ. सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही १४ वर्ष छळ सोसला ते बलिदानच. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय.आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही लोकशाही वाचवण्याची आहे. भाजप मधील सावरकर भक्त आहात तर अंध भक्त होऊ नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कसं हे सहन करतात?. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमची मला आवश्यकता आहे. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन उचलला तसा लोकांनी पण हातभार लावला तसा तुम्ही पण हातभार लावा. रावण धनुष्य घेतांना उताणा पडला तिथे हे मिंधे कोण? मी तुमच्या सोबतीने लढायला उभा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.