breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘परवा जागतिक गद्दार दिन आहे’; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर खोचक टीका

मुंबई : शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन आहे. वर्धापन दिन होण्यापुर्वी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार चोरून, खासदार फोडून सत्ता विकत घेता येते. पण जिवाला जीव देणारे सोबती विकत घेता येत नाहीत. ते सोबती मला लाभले आहेत ही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. तुमचं ऋण मी कितीही प्रयत्न केला तरीही फेडू शकणार नाही. कागदावर माझ्याकडे पक्षाचं नावही आणि चिन्ह नाही. तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं. त्यानंतर आपण जी पदं त्यांना दिली ते लाचार मिंधे सत्तेच्या मोहासाठी आणि खोक्यांसठी पलिकडे गेले. आत्ता तुम्हाला माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही तरीही तुम्ही माझ्यासह आहात. हे सगळं पाहिल्यानंतर मी भारावून गेलो आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला २० जूनला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्यानंतर मागचं वर्षभर जी लोकं भेटत आहेत, कुणीही असोत. शिवसैनिक, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळे सांगत आहेत की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कोव्हिडमध्ये आपण काय काम केलं ते तुम्ही आणि सगळ्यांनीच पाहिलं आहे. जो सुखमें साथ रहते है उनको रिश्ते कहते हैं जो दुखमे साथ देते आहे उन्हे फरिश्ते कहते हैं. तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात तोपर्यंत कितीही शाह आणि अफझल खान आले तरी मला पर्वा नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button