शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये, पण….

मुंबई : विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी विधीमंडळ परिसरात खास फोटो सेशन करण्यात आले. मात्र, सर्वाचे लक्ष उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे वेधले होते. कारण शिवसेना फुटीनंतर ठाकरे शिंदे पहिल्यांदाच एकाच फ्रेममध्ये दिसले. मात्र, दोघांनी एकमेकांकडे बघण आणि बोलणे दोन्हीही टाळले. त्यामुळे दानवेंचे निरोपाचे हे फोटो सेशल चर्चेचा विषय ठरत आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दानवे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना निरोप दिला. नंतर विधान भवन परिसरात खास फोटो सेशन करण्यात आले. यावेळी, सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना आणि राजकारणापलीकडचे नाते जपताना दिसले. जनतेचे प्रश्न किंवा सत्ताधाऱ्यांच्या योजनांवरून एकमेकांवर धावून जाणारे नेते एकाच फ्रेममध्ये दिसले.
हेही वाचा – शेतकऱ्यांशी संवाद, समन्वय ठेवूनच भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार
या फोटो सेशनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती नीलम गोहे, सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. चित्रा वाघ, मिलिंद नार्वेकर, बावनकुळे हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे देखील या फोटो सेशनमध्ये सहभागी झाले होते. “दूरवर तुमचं चाहत राहून पाहुण्यासारखं आहे,” असे विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. मात्र, त्यांनी यावेळी शिंदेंसोबत बोलणे टाळले.





