‘मी सन्यास घेणार नाही’; उदयनराजे भोसलेंचं सूचक विधान
![Udayanaraje Bhosle said that I will not take Sannyas](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Udayanraje-Bhosale-780x470.jpg)
सातारा | भाजपने लोकसभा उमेदवारीच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. मात्र, काही महत्वाच्या नेत्यांना वेटिंगवर ठेवले आहे. राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना उद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. उदयनराजे भोसले यांना त्यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उदयनराजे म्हणाले की, त्याबद्दल बोलणं औचित्य ठरणार नाही. तीन पक्ष एकत्र आले आहेत. सीट वाटपात पुढे मागे होईल. प्रत्येकाला वाटतं जास्त सीट मिळाव्यात आणि ते रास्त आहे. त्यात चुकीचं नाहीये. जे काही होईल त्यानंतर बघू.
हेही वाचा – ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा अन्यथा..’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
तुमचा पुढचा निर्णय काय असेल? असा सवाल उदयनराजे यांना करण्यात आला. यावर ते म्हणाले, मी काही संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. संन्यास घेणार नाही यात आलं ना सगळं, असं सांगतानाच माझ्याकडे तिकीट आहे. प्लेनचं आहे. बसचं आहे. रेल्वेचं आहे. पिक्चरचं आहे. बस आहे ना? बाकीच्यांच्या तिकीटाचं माहीत नाही. ते ठरवतील त्यावेळी बघू, असं उदयनराजे म्हणाले.