breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नारायण राणेंच्या घराबाहेर भाजपा कार्यकर्ते आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा

मुंबई |

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.

नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक समोर आल्याने जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर धडक देत आंदोलन सुरु केलं आहे.

युवासेनेचे कार्यकर्ते बंगल्यापर्यंत पोहचू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र वरुण सरदेसाई यांनी बंगल्यापासून जवळच ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. “आमच्या देवावर कुणी हात उगारण्याची भाषा केली तर कायदा सुवव्यस्थेबाबत युवासैनिक विचार करणार नाही,” अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिले. नारायण राणेंच्या या वक्तव्या विरोधात मध्यरात्रीच दादरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती. स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या एक तासात हे पोस्टर हटवले आहेत. राणेंविरोधात लावलेले हे पोस्टर जरी काढून टाकले असले तरी या पोस्टर्सचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. या पोस्टरमध्ये राणेंचा क्लोजअप फोटो लावून त्याच्या बाजूला कोंबडी चोर असं लिहिण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button