breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मावळमध्ये पावणे तीन लाख मतदार वाढले

पुणे : पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या ३३ लाख ५६ हजार ८३६ आहे. त्यात २३ जानेवारी २०२४ पर्यंत नोंद केलेले २५ लाख ९ हजार ४६१ म्हणजेच ७४.७६  टक्के मतदार आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २५ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याने मतदारसंख्या बदलू शकते. पुरुष मतदार १३ लाख १० हजार ४३४, स्री मतदार ११ लाख ९८ हजार ८६८ आणि इतर (तृतीयपंथी) १५९ आहेत. मतदारसंघात एकूण २ हजार ५६२ मतदान केंद्र आहेत.

मावळ लोकसभा निवडणूक मतदान केंद्रांसाठी ३ हजार ७५ यंत्रांची आवश्यकता आहे. त्यांच्यासह राखीव मतदान यंत्र मिळून तीन हजार ५९४ यंत्र आहेत. इतकेच नियंत्रण यंत्र असून तीन हजार ८१९ व्हीव्ही पॅट यंत्र उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय सहा ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार असून, मतदान झाल्यानंतर बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात सुरक्षा बंदोबस्तात ठेवली जाणार आहेत. तीन ते सहा मे या कालावधीत मतदान यंत्रे तयार केले जाणार आहेत. मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे १२ मे रोजी सर्व साहित्य दिले जाईल, त्यानंतर ते आपापल्या मतदान केंद्रावर जातील.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; एकूण संपत्ती किती?

मावळ लोकसभा मतदार संघात २५ लाख ९ हजार ४६१ एकूण मतदार आहेत. यामध्ये १३ लाख १० हजार ४३४ पुरूष तर ११ लाख ९८ हजार ८६८ महिला मतदार आहेत. महिलांच्या तुलनेने १ लाख ११ हजार ५७२ पुरूष मतदार जास्त आहेत.

सहा मतदार संघात पावणेतीन लाख मतदार वाढले

मावळ लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ लाख २७ हजार ६३३ मतदार होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २५ लाख ९ हजार ४६१ मतदार संख्या असल्याचे समोर आले. त्यामुळे गेल्या पाच वर्षात या मतदार संघात तब्बल २ लाख ८१ हजार ८२८ मतदारांची वाढ झाली आहे.

विधानसभा मतदार संघानुसार २०१९ आणि २०२४ च्या मतदारांची आकडेवारी

मतदार संघ    २०१९                 २०२४

चिंचवड       ४७६७८०           ५९५४०८

पिंपरी         ३४१७०१            ३६४८०६

मावळ         ३३२११२             ३६९५३४

पनवेल         ५१४९०२            ५६५९१५

उरण            २८६६५८           ३०९२२७५

कर्जत          २७५४८०            ३०४५२३

एकूण          २२२७६३३            २५०९४६१

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button